- नागपूरमध्ये क्राईम ब्रांच युनिट कडून क्रिकेट सट्टेबाजी आणि हवाला व्यवहारासाठी भाड्याने बँक खाते चालवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला
- पोलिसांनी वैभव बघेल आणि सुमित पटले या दोन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आणखी आठ आरोपी शोध सुरू आहे
- या रॅकेटने लोकांना फसवून त्यांच्या दस्तऐवजांचा गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. गोंदिया जिल्ह्यातील दीपक गायधने या युवकाला नोकरीच्या आमिषाने आरोपींनी फसवले
- व्यापार नोंदणीच्या नावाखाली आरोपींनी त्याचे आधार आणि पॅन कार्ड घेतले आणि त्याच्याच नावाने हिंगणा येथील बँक ऑफ बडोदा शाखेत खाते उघडले
- या खात्यातून सुमारे ७ कोटी रुपयांचे हवाला आणि सट्टेबाजीशी संबंधित व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या रॅकेटचा संपूर्ण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा